LineBetweenFriendship

Wednesday, January 17, 2007

Mala tila baghaychey............

Monday, January 15, 2007

अशी असते ती मैत्री..

अशी असते ती मैत्री...

मैफ़लीत रंगून जाते ती गायत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात या गोष्टी
माझ्याशी सुद्धा कराल ना तुम्ही गट्टी??

आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

Friday, January 12, 2007

मैत्री

मैत्री म्हणजे विश्वास
धिर आणी दिलासा
मैत्री म्हणजे जिवांमधील सेतु
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणी तु

दोस्तीचा शिरकावा असा का
आभाळातुन होत नसतो
जिवाचा जिवलग जोडायला
आधी जिव लावावा लागतो

संकटे समोर येत होती
जिवनात माझ्या धोका बनुन
तारलेस तु माझे जिवन
सावरणारा हात बनुन

मैत्री फ़क्त म्हणण्यापुर्ती नसावी
तर ति निरंतर असावी
जशी सागराला किनारयाची
अखंड साथ असावी